देशात आतापर्यंत कोविड १९ चे २ कोटी ८९ लाख ८४ हजार रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ६८ हजार ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. लागोपाठ ४१ व्या दिवशी कोरोनावर मात केलेल्यांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

देशात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या  २ कोटी ८९ लाख ८४ हजार झाली आहे.  बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९६ पूर्णांक ४९ शतांश टक्के झालं आहे. काल ५० हजार ८४८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.

सध्या देशात ६ लाख ४३ हजार १९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे गेल्या चोवीस तासात १ हजार ३५८ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३ लाख ९० हजारांच्या वर गेली आहे.