मनी लाँडरिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधल्या घरावर सक्तवसुली संचालनालयानं छापा टाकला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँडरिंगचा गुन्हा देशमुख यांच्याविरुद्ध नोंदवला होता. यापूर्वी सचिन वाझे प्रकरणात सीबीआयनं त्यांच्या कार्यालयाची आणि निकटवर्तियांच्या घरांची झडती घेतली होती. तसंच मुंबईतल्या ज्ञानेश्वरी या सरकारी निवासस्थानावरही सिबीआयने छापे टाकले आहेत.