राज्यात १० हजार ६९७ नवे कोविड रुग्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार ६९७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५८ लाख ९८ हजार ५५० झाली आहे. शनिवारी ३६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख आठ हजार ३३३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे.

शनिवारी १४ हजार ९१० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ३१ हजार ७६७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ४८ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ५५ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Popular posts
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image