देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ४३ शतांश टक्क्यांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचे नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण देशभरात झपाट्यानं कमी होत आहे. बाधासक्रीय रुग्णांची संख्या कालच्या दिवसभरात ५० हजारानं कमी होऊन ९ लाख ७३ हजारावर आली. काल दिवसभरात एक लाख १९ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५ पूर्णांक ४३ शतांश टक्के झाला आहे. आजपर्यंत या आजारातून २ कोटी ८१ लाख रुग्ण बरे झाले आहेत.कालच्या दिवसात ७० हजार ४२१ नवे रुग्ण आढळले तर ९२१ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात सुमारे ३ लाख ७४ हजार रुग्ण दगावले आहेत.