मिल्खासिंग यांच्या पार्थिवावर आज चंदीगड इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे धावपटू फ्लाईंग सिख या नावाने ओळखले जाणारे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मिल्खासिंग यांच्या पार्थिवावर आज चंदीगड इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर सिंग यांना मानवंदना द्यायला उपस्थित होते.

मिल्खासिंग यांचं काल रात्री साडे अकरा वाजता चंदीगड इथं रुग्णालयात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर गेला महिनाभर ते आजारी होते. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा गोल्फपटू जीव मिल्खा सिंग आणि तीन मुली आहेत. त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं नुकतच कोरोना या आजाराने निधन झालं होतं.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे मिल्खासिंग यांचा संघर्ष आणि संकल्प भारतीयांसाठी एक प्रेरणास्रोत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आहे मिल्खासिंग यांच्या निधनानं देश एका महान खेळाडूला मुकला आहे असं ते म्हणाले. लाखो लोकांसाठी मिल्खासिंग प्रेरणास्रोत होते असे मोदी यांनी म्हटले आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केला आहे भारतीय क्रीडा क्षेत्र सदैव त्यांचा स्मरण करेल असा ते म्हणाले.

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे ते सर्वांसाठी कायमच प्रेरणास्थानी राहतील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.या महान क्रीडापटूला आदरांजली म्हणून पंजाब सरकारने संपूर्ण राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. 

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image