रायगड जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधल्या श्रीगाव या गावात वादळामुळे पडलेल्या घरांच्या नुकसानीची आज केंद्रीय पथकाने पाहणी केली असून शासकीय अधिकाऱ्यांकडून एकूण झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच अलिबाग तालुक्यातील तळवडे या गावातील आंब्याच्या बागेतील नुकसानीची पाहणी ही पथकाने केली. वादळाने पडलेल्या आंब्याच्या कलमांची आणि शेतीचे  किती नुकसान झाले याची माहिती यावेळी पथकाने कृषी अधिकाऱ्यांकडून घेतली. त्या आधी काल पालघर जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाच सदस्यांच्या केंद्रीय समितीनं  काही गावांत जाऊन पाहणी केली होती.