दत्तक बालकांबाबत माहिती देण्याचे बालहक्क आयोगाचे समाजमाध्यामांना निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीत पालक मृत्युमुखी पडल्यानं निराधार झालेल्या बालकांना थेट दत्तक घेण्याचं आवाहन करणाऱ्या पोस्ट्स ची माहिती राष्ट्रीय बालहक्क आयोगाने समाजमाध्यमांकडे मागितली आहे. अशा पोस्ट्सचे मूळ स्रोत, त्यांचे आयपी अॅड्रेस, आणि इतर माहिती येत्या १० दिवसात सादर करण्याचे निर्देश आयोगाने फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम या माध्यमांना पत्र लिहून दिले आहेत.

देशात दत्तकविधानासाठी ज्युव्हेनाईल जस्टीस अॅक्ट म्हणजे अज्ञान मुलांसाठी न्याय कायद्याने निश्चित केली आहे. ती टाळून मूल दत्तक घेण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असून अशा कारवायांमधे गुंतलेल्या स्वयंसेवी संस्थावर कायद्याचा बडगा उगारण्याचे निर्देश राज्यसरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.