अंमली पदार्थ मुक्त भारत साकारण्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यावं- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या समाजातली अंमली पदार्थांची कीड नष्ट करण्यासाठी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात कौतूक केलं आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ते बोलत होते.

अंमली पदार्थ म्हणजे अंधकार, नाश आणि दिशाहीनतेला आमंत्रण असे, म्हणत त्यांनी यापासून जीवन वाचवणे महत्वाचं असल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.

व्यसन म्हणजे स्टाईल स्टेटमेंट नव्हे असे म्हणत त्यांनी अंमली पदार्थांविरोधी लढ्यात प्रत्येकानं सहभाग घ्यावा आणि अंमली पदार्थ मुक्त भारत साकारण्यासाठी योगदान द्यावं असं अवाहन केलं.