नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सगळं जग कोविड महामारीशी लढत असताना योग हा एक आशेचा किरण राहिला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जनतेला संबोधित करत होते. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे योगदिनाला मोठे समारंभ आयोजित केले गेले नसले, तरी योगाबाबतचा उत्साह मावळलेला नाही. कोविड १९ शी आपण लढू शकतो, हा विश्वास योगाने दिला आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी कुणीही मानसिक दृष्ट्या तयार नसतांना योग हे आत्मविश्वासाचे माध्यम ठरले, असे मोदी म्हणाले. योगाने शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही भर दिला आहे. योग आपल्याला तणावातून कणखरपणाकडे, आणि नकारात्मकतेकडून सर्जनशीलतेकडे जाणारा मार्ग दाखवतो, सर्वंकष आरोग्य आणि जगण्याचा अधिक आनंददायी मार्ग योगाने दिला आहे, लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यामधे योग प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहक भूमिका यापुढेही बजावत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आजकाल वैद्यकशास्त्रही वैद्यकीय उपचारांबरोबरच बरे होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर भर देत आहे. या नैसर्गिक प्रक्रियेसाठी योगाची मदत होते. रुग्णांकडून अनुलोम विलोम, प्राणायाम करुन घेतला जातो. या व्यायामामुळे श्वसन संस्था मजबूत होते असे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ञ सांगत आहेत, असे मोदी म्हणाले. बहुतांश देशांसाठी योग दिन हा केवळ प्राचीन सांस्कृतिक सण राहिले नसून लोकांमध्ये योगाविषयी प्रेम आणि उत्साह वाढला आहे. जेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्री योग दिनाचा प्रस्ताव मांडला तेव्हा संपूर्ण जगात योगाचा चांगल्या प्रकारे प्रचार- प्रसार व्हावा ही त्यामागची भावना होती. त्या दिशेने भारताने संयुक्तक राष्ट्रां सोबत आज एक महत्वांचे पाऊल उचलले आहे, असे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
एम योग अॅप सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. या ॲपमधे जगातल्या अनेक भाषांमध्ये योग प्रशिक्षणाचे अनेक व्हीडीओ उपलब्ध असतील. त्याद्वारे भारताचा 'एक विश्वा एक आरोग्य' हा विचार पुढे नेता येईल, असं ते म्हणाले.
आयुष राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी सांगितलं की आयुष मंत्रालय योगाच्या प्रसारात महत्वाची भूमिका बजावत राहील. आरोग्यासाठी योग ही या आंतरराष्ट्रीय योग दिनाची मुख्यि संकल्पना आहे. जगातल्या सुमारे १९० देशांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपापल्या घरातच योगासने केली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.