मागील सात वर्षात रेकॉर्ड ब्रेक महागाई दर : डॉ. कैलास कदम

 

पिंपरी : मागील सात वर्षात वाढलेला महागाईचा दर म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या रोज वाढत जाणाऱ्या दरांमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. याचे श्रेय देखील केंद्रातील मोदी सरकारने घ्यावे. देशातील १३५ कोटी जनता कोरोनाच्या महामारी आणि महागाईत होरपळून निघत आहे. या महागाईमुळे कोट्यावधींचा रोजगार गेला आहे. कष्टकरी नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण आणावे आणि पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची भाववाढ मागे घ्यावी अशी मागणी इंटकचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.

पेट्रोल शंभर रुपये प्रति लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ब्यान्नव रुपये प्रति लिटर झाले आहे. तर घरगुती गॅसही नऊशे रुपयांच्या पुढे गेल्याने सोमवारी चिंचवड स्टेशन येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशाने डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिचंवड काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, सोशल मिडिया विभागाचे शहराध्यक्ष आयुष मंगल, हिंद कामगार संघटनेचे उपाध्यक्ष शांताराम कदम, खजिनदार सचिन कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कौस्तुभ नवले, महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यू.आय.चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस शंकर ढोरे, मजदूर महिला संघाच्या अध्यक्षा भारती घाग, सुनीता जाधव, बबिता ससाणे, सुवर्णा कदम, सुनीता कुसाळकर, कुसुम वाघमारे, निलम सूर्यवंशी कामगार प्रतिनिधि विजय राणे, सुरेश संदूर, अमोल पाटील, संतोष पवार, विनोद वाघ, तानाजी लोखंडे, हमिद इनामदार, संतोष आरबेकर, दत्ता पवार, फिलिप सिकंदर, अभिजीत मोरे, अमित मोरे, अलोक लाड, विशाल सरवदे, मिलिंद बनसोडे, योगेश नायडू, संतोष देवकर,अनिल सोनकांबळे, तेजस पाटील, अर्णव कामठे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, विजय ओव्हाळ, उमेश बनसोडे, मारुती पंद्री आदी उपस्थित होते.

डॉ. कैलास कदम म्हणाले की, मोदी सरकारने गोरगरिबांना रस्त्यावर आणले आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या कुंभकर्णी सरकारचे डोळे उघडण्यासाठी आता जनता रस्त्यावर उतरली आहे. महागाई कमी केली नाही आणि पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसची भाववाढ मागे घेतली नाही तर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी तीव्र निदर्शने करू असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.