पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंडनं पटकावलं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंड पटकावलं आहे. अजिंक्यपदासाठी इंग्लडच्या साऊदम्पटन इथं झालेल्या अंतिम सामन्यात कालच्या राखीव दिवशी न्यूझीलंडनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला.

भारतानं कालच्या राखीव दिवशी भारतानं २ गडी बाद ६४ धावांवरून आपला दुसरा डाव सुरु केला. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी गडगडली आणि भारताचा संघ १७० धावांमध्येच तंबूत परतला.

न्यूझीलंडनं पहिल्या डावात भारतावर ३२ धावांची आघाडी घेतल्यानं त्यांना विजयासाठी १३९ धावांचं आव्हान मिळालं. न्यूझीलंडनं हे आव्हान ४६ षटकांमध्ये केवळ २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत, ऐतिहासिक विजेतेपद मिळवलं. न्यूझीलंडच्या जॅमीसनला सामनावीराच्या किताबानं गौरवण्यात आलं.