लहान मुलांसाठी भारत बायोटेकद्वारे निर्मित लसीच्या चाचणीला नागपुरात आरंभ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचणीसाठी 100 बालकांची नोंदणी झाली असून यातील 50 जणांची निवड करून पहिल्या लसीची मात्रा देण्यात येणार आहे. अशी माहिती या संशोधनाचे नागपूरातील मुख्य संयोजक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी काल नागपूरात प्रसारमाध्यमांना दिली.