पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पद्म पुरस्कारांसाठीआता १५ सप्टेंबरपर्यंत  नामांकन दाखल करता येणारआहेत. या नामांकनासाठी  padmaawards.gov.in.या पोर्टंलवर अर्ज करता येणार आहेत. पद्म विभूषण, पद्म भूषण और पद्मश्री पुरस्‍कार हे देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कारअसून त्याची सुरुवात १९५४ साली झाली होती. दर वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे२६ जानेवारीला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असते.