प्राप्तीकर विभागाचं नवीन पोर्टल सोमवारपासून कार्यान्वित होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्ती करदात्यांना कर विवरण पत्र ऑनलाईन भरता यावं यासाठी प्राप्ती कर विभागानं www.incometax.gov.in हे नवीन पोर्टल तयार केलं असून उद्यापासून हे पोर्टल सुरू होत आहे. करदात्यांसाठी अधिक सोईस्कर तसंच अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असलेल्या या पोर्टलवरून करपरताव्याची प्रक्रियाही जलद गतीनं पार पाडली जाईल, असं अर्थ मंत्रालयानं म्हंटलं आहे.  कर विवरण पत्र भरताना कोणती कागदपत्र आणि माहिती आवश्यक आहे; हे सांगणारा एक डॅशबोर्डही यात असेल. तसंच नागरिकांच्या प्रश्नाची निशुल्क उत्तर मिळण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे. करदात्याचं उत्पन्न, स्थावर मालमत्ता, व्यवसाय आणि विवरण पत्र भरताना आवश्यक असलेली अन्य माहिती करदाता या पोर्टलवर सादर करू शकतो. यानंतर एक मोबाईल अॅप देखील सुरू करणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image