पंतप्रधान येत्या रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल.

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून, तसंच www.newsonair.com हे संकेतस्थळ आणि newsonair या मोबाईल अॅपवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होईल. आकाशवाणी, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल.

या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण केलं जाईल.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image