कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत भारताने अमेरिकेला मागे टाकले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु असलेल्य़ा कोविड लसीकरण मोहिमेबाबत समाधन व्यक्त केलं आहे. देशात आतापर्यंत ३२ कोटी ३६ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून भारतानं अमेरिकेलाही माग टाकल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. लसीकरण मोहिम जलद गतीनं राबवत असल्यानं प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं असून सर्व नागरिकांचं निशुक्ल लसीकरण करणार असल्याचं त्यांनी पुन्हा नमुद केलं आहे.माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही लसीकरणात भारतानं अमेरिकेला मागे टाकल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.