राज्यात टपाल विभागातर्फे एम्बुलन्स सुविधा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात टपाल विभागातर्फे कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सोयीसाठी एम्बुलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. माल वाहतूक करणारी वाहनं टपाल खात्यानं एम्बुलन्समध्ये परिवर्तित केली आहेत. या वाहनांत वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध आहेत. पुणे, औरंगाबाद, नागपूर तसेच कोल्हापूर इथल्या पोस्ट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसासाठी ही सुविधा उपलब्ध असेल.