पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित

 

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील सी ओ ई पी मैदानावरील जम्बो कोविडवरील उपचार रुग्णालय बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

याठिकाणी सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याने आणखी एक ते दोन आठवडे हे रुग्णालय नवीन रूग्णांना प्रवेश न देता सुरूच ठेवलं जाणार आहे. तर, अतिदक्षता विभागातील ५० खाटा कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने तसेच नवीन रुग्णही दाखल होणे बंद झाल्यानं महापालिकेनं १ जून रोजी या रुग्णालयातील ३०० ऑक्सिंजन खाटा कमी केल्या होत्या. त्यानंतर आणखी १०० खाटा कमी करण्यात आल्या होत्या.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image