येत्या २६ जूनपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात - विनायक मेटे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या २६ जूनपासून, मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपण राज्याचा दौरा करत असल्याचंही, त्यांनी रविवारी औरंगाबादमध्ये समाज बांधवांशी संवाद साधल्यानंतर, एका पत्रकार परिषदेत सांगितलं. येत्या पाच जुलै पर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही, तर येत्या सात जुलैपासून सुरु होणारं राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा, त्यांनी यावेळी दिला.