प्रधानमंत्र्यांनी २४ व्या बिमस्टेक दिनाच्या दिल्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २४ व्या बिमस्टेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर अलिकडच्या वर्षांत जगानं अनेक आघाड्यांवर सामूहिकरीत्या काम केलं असून कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्र काम करण आवश्यक असल्याच्या मुद्द्यावर मोदी यांनी यावेळी भर दिला.

बिमस्टेक अंतर्गत प्रादेशिक सहकार्याबद्दल मोदी यांनी प्रशंसा केली. मोदी यांनी वाहतूक दळणवळणासाठी बिम्सटेकच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या योजनेच्या अंतिम स्वरूपाची माहिती घेतली.

बिमस्टेकच्या माध्यमातून दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया यांना जोडण्यास मदत होत असून पूर्वेकडील देशांशी व्यवहार करणं आणि इंडो-पॅसिफिक धोरणांना यामुळे मदत होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं.