विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास या जोडीने नेदरलँडच्या जोडीला ५-३ असे हरवले. तर दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी यांच्या महिला रिकर्व टीमने मेक्सिकोला ५-१ असे हरवत सुवर्ण पदक जिंकले.