राज्यात एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

  मोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई: राज्यातील गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या  मोफत  शिवभोजन थाळी योजनेचा 1 कोटींहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. 15 एप्रिल ते 28 जून या काळात 1 कोटी 7 लाख 59 हजार 90 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

15 एप्रिल 2021 ते 14 जुलै 2021 पर्यंत या योजनेचा कालावधी आहे. असा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने 17 जून 2021 रोजी निर्गमित केला आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 4 कोटी ८६ लाख ९५ हजार ६८७ थाळ्यांचे वितरण झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 1332 शिवभोजन  केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात एकूण  1068  शिवभोजन केंद्रे सुरु आहेत. उर्वरित  केंद्रे लवकरच  सुरु होतील.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image