ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजनवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा चालू आहे, व्हेंटीलेटर लावलेला नाही असं त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी सांगितलं आहे.

दिलीप कुमार यांच्या काही चाचण्यांचे अहवाल यायचे बाकी आहेत. ते येत्या दोन तीन दिवसात घरी जातील. यासंदर्भात व्हॉट्सअॅप वर फिरणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटरवर करण्यात आलं आहे.

दिलीप कुमार यांना श्वासोच्छ्वासाला त्रास होत असल्यानं काल सकाळी मुंबईत खार इथल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.