राज्यातल्या पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : ज्यातल्या पोलिसांना त्यांच्या हक्काची घरं मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत असून गृह आणि गृहनिर्माण या विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले जाईल, अशी माहितीनगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. या संदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकितया धोरणाला तत्वत: मंजूरी देण्यात आली. शॉर्ट टर्म, मिडीयमटर्म आणि लॉंग टर्म अशा तीन टप्प्यात या धोरणाचं प्रारूप तयार करण्यात आलं आहे. याबैठकित गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमारश्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याचेपोलीस महासंचालक संजय पांडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.