मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्माला १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्माला मुंबई इथल्या विशेष न्यायालयानं १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शर्मा याला गेल्या १७ जुनला अटक करण्यात आली होती. त्याची एनआयए कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्याला आज न्यायालयानं न्यायालय कोठडी सुनावली आहे. शर्मा व्यतिरिक्त संतोष शेलार आणि आंनद जाधव या दोन आरोपींनाही १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.