महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पाटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

पिंपरी : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष व आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा, रक्तदान शिबिर व शिधावाटपाचा कार्यक्रम दिनांक 5 जून 2021 रोजी, सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत, दिलीप पांढरकर यांचे जनसंपर्क कार्यालय आकुर्डी येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. नगरसेवक विश्वास गजरमल यांनी भूषविले, त्यावेळी प्रथम शिव प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विश्वास गजरमल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मोदी सरकारने देशाची आर्थिक स्थिती ही नाजूक केली आहे, जीडीपी पाहिला तर देशासमोर मोठे आर्थिक संकट लादले आहे, ते सावरण्यासाठी मोठा काळ लागणार आहे. भाजपा सरकारने देशाला 'अच्छे दिन'च्या नावाखाली संपूर्ण देश हा संकटात लोटला आहे. देशाची सर्व अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर संपूर्ण देश व्यापाऱ्यांच्या हातात जाईल, जनता गुलामगिरीत जाण्याची शक्यता आहे. म्हणून सांगतो येत्या निवडणुकीत या सत्ताधारी पार्टीला देशातील सत्तेतून बाहेर काढा आणि देशाला वाचवा.

तसेच शहर काँग्रेस उपाध्यक्ष श्री दिलीपभाऊ पांढरकर यांनी त्यांच्या मनोगतात, मा. नाना पटोले हे धाडसी नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला लाभले आहे. नानांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची दमदार वाटचाल चालू आहे. नाना सर्वव्यापी नेतृत्वावर भर देत असल्याने महाराष्ट्रातील कोणत्याही काना-कोपऱ्यात होणाऱ्या घटनेकडे नानांचे लक्ष असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व चैतन्य वाढले आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिका 2022 च्या निवडणुकीत भ्रष्टाचारी भाजपा सत्तेतून हद्दपार करा, शहरात सध्या कोणताही विकास झाला नाही, होतही नाही. हा पक्ष पुन्हा सत्तेवर राहिला तर, भविष्यातही कोणताही विकास होणार नाही, म्हणून त्यांना सत्तेतून बाहेर काढा.

शहरात अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रेड झोन हद्द कमी करणे, अनाधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकरातून जनतेची सुटका करणे, आरक्षित जागेतील बांधकामाचा प्रश्न मार्गी लावणे, शेतकऱ्यांचे साडेबारा टक्के प्रश्न सोडविणे, इ. अनेक समस्या शहरात प्रलंबित आहेत. या सोडण्यासाठी काँग्रेस शहरात पुन्हा सत्तेत आली पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले.

तसेच मागील 10-15 वर्षात भूमिगत झालेले काँग्रेसचे कार्यकर्ते बाहेर आले व त्यांना काँग्रेस पक्षाचा पुन्हा विश्वास वाटू लागला. अनेक वर्षांनी पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेसमय वातावरण बघून त्यांना आनंद व अभिमान वाटला, असे मनोगत जेष्ठ पदाधिकारी श्री एस टी पाटील, जनार्दन पोलकडे, बाबूलाल वाघमारे, बबनराव जाधव यांनी व्यक्त केले.

अशोक पांढरकर, वत्सला ताई जाधव, अर्चना कडू, रंजना बहिरट, विजयबुवा जाधव यांनी मा. नानाभाऊ पटोले यांना वाढदिवसाच्या व त्यांच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. मकरंद शहापूरकर यांनी रक्तदान विषयक सखोल माहिती व महत्त्व पटवून दिले. त्यावेळी डॉ. निर्मल ठाकूर, डॉ. शामल सोनवणे, डॉ. राहूल, तंत्रज्ञ बालाजी, भारत चौधरी, यांनी रक्तदान प्रक्रिया व हिमोग्लोबिन चेक करण्याचे कामकाज पाहिले.

यावेळी अँड राजेंद्र काळभोर, अँड. मोहनराव अडसूळ, प्राजक्ता पांढरकर, सागर पांढरकर, अल्ताफ मुल्ला, विशाल पालीवाल, अमित पांढरकर, चुन्‍नीलाल इंगळे, स्नेहा तेली, दत्ता शिंदे, रवींद्र पिंजण, अनिता मुंडे, रवींद्र शिंदे यांच्यासहित 27 जणांनी रक्तदान केले.

तसेच दिलीप भाऊ पांढरकर यांच्यावतीने वाढदिवसानिमित्त 300 गरजू व गरीब लोकांना अनुक्रमे 5 किलो आटा बॅग, 2 किलो तांदुळ, 1 किलो शेंगदाणे, 1 किलो पोहे, 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चिवडा पाकीट, 1 किलो मीठ अशा जीवनावश्यक 8 वस्तुचे शिधा व मास्क वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या वेळी करोनानिमित्त शासनाने निर्देश केलेले सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी पोलिस यंत्रनेचे सहकार्य मिळाले.

पिंपरी चिंचवड शहरातील कवी श्री विवेक मिसाळ यांनी मा.नाना पटोले यांचे वाढदिवस अभिचितंन पर स्वअक्षरात लिहिलेले अभिनंदन पत्राचे वाचन करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांचे वाढदिवसानिमित्त किवळे-रावेत, निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिपंरी, दापोडीसह जवळ जवळ शहरभर काँग्रेस पक्षाचे झेंडे, वाढदिवसाचे बँनर, होल्डिंग, फ्लेक्स लावण्यात आल्यामुळे काँग्रेसमय वातावरणाची निर्मिती झाली.

सदर कार्यक्रमाचे नियोजन व सयोंजन हर्षवर्धन पांढरकर, शैेलेश वाल्हेकर, राहुल जाधव, ओंकार साने यांचे नेतृत्वाखाली शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश लिंगायत यांनी केले. शेवटी दिलीप भाऊ पांढरकर यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.