कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे प्रजननावर परिणाम होत नाही- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देत असून राज्यातही कालपासून १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्यात सुरुवात करण्यात आली आहे.

मात्र लसीकरणाबाबत सामाजिक माध्यम आणि अन्य माध्यमांवर होणारा अपप्रचार आणि गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने लसीकरणाबाबतच्या अपप्रचाराला उत्तर म्हणून विशेष मोहीम सुरु केली आहे.

प्रजननक्षम वयोगटातील लोकांमधे कोविड -१९ लसीकरणामुळे वंध्यत्व येत असल्याच्या चिंता व्यक्त करणाऱ्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र लसीकरणामुळे प्रजननावर परिणाम होत नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पुरुष किंवा महिलांमधे वंध्यत्व येते असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नसून या लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. तसंच सर्व स्तनदा मातांनादेखील ही लस सुरक्षित आहे. लसीकरणा आधी किंवा नंतर स्तनपान थांबवण्याची गरज नसल्याचं राष्ट्रीय तज्ञ गटानं म्हटलं आहे.

Popular posts
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image