सावली निवारा केंद्रात आम आदमी पार्टीच्या वतीने मोफत जेवण

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे जेवण वाटप करण्यात आले. आज पहिल्यांदा सावली निवारा केंद्रात भेट देण्याचा योग आला. केंद्राचे प्रबंधक श्री गौतम थोरात यांनी तिथल्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाद्वारा संचालित ह्या केंद्रात राहणाऱ्या लोकांचे कौशल्य पाहून, त्यांचा अभिमान वाटला. एक चित्रकार तर एक गायक असे बोलतांना आपचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनुप शर्मा यांनी सांगितले.

आजच्या जेवण वाटप अभियानाचे श्रेय नंदूजी नारंग यांना जाते. तसेच किशोर जगताप यांच्या सहयोगाने कार्यक्रम सुखरूप पार पडले. असे आपच्या पिंपरी चिंचवड महिला विंग अध्यक्षा स्मिता पवार यांनी आभार व्यक्त करताना सांगितले.

या प्रसंगी यशवंत कांबळे अध्यक्ष आप सामाजिक न्याय विंग पिंपरी चिंचवड, नंदूजी नारंग अध्यक्ष आप पिंपरी विधान सभा, माधुरी गायकवाड उपाध्यक्ष आप महिला विंग पिंपरी चिंचवड, वैजनाथ शिरसट आप शहर समिती सदस्य, किशोर जगताप सचिव आप पिंपरी चिंचवड, वहाब शेख अध्यक्ष आप सामाजिक न्याय विंग पुणे जिल्हा, मुकेश रंजन उपाध्यक्ष आप पिंपरी विधान सभा, स्वप्नील जेवळे सचिव भोसरी विधान सभा, चांद मुलाणी सदस्य, विजय अब्बाड उपाध्यक्ष आप सामाजिक न्याय विंग पिंपरी चिंचवड, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image