जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई : सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे.आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी विहित वेळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

त्यामुळे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये, यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी‍ समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज करावा, त्यामुळे विहीत वेळेत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.

Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image