मुंबईवरील अतिवृष्टीचा धोका टळला, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रावर घोंघावणाऱ्या वादळी वाऱ्यांचा वेग मंदावला असून त्यांची दिशाही बदलली असल्याचं प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं कळवलं आहे. मुंबईवरचा धोका कमी झाला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधे आज आणि उद्याकरता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधे येत्या काही दिवसांकरता ऑरेंज अलर्ट राहील.

तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट,आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो असा वेधशाळेचा अंदाज आहे. कोकणात सर्व जिल्ह्यंमधे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.