पालघर जिल्ह्यातल्या फटाक्याच्या कंपनीला आग

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या डेहणे-पळे या गावाजवळ काही अंतरावर असलेल्या विशाल फायर वर्क या फटाक्याच्या कंपनीत आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागली.

कंपनीत फटाके असल्यानं स्फोट होऊन आग लागली अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या आगीत पाच कामगार जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या, पोलीस प्रशासन दाखल झाले. आता बऱ्याच प्रमाणात आग विझली असून उर्वरित आग विझवण्याचं काम सुरू आहे.