१२ ते १८ वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीकरण चाचणी सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांना कोरोनाची लस देण्याची चाचणी आजपासून नागपुरात सुरू होणार आहे. काल नागपुरात १२ ते १८ वयोगटातल्या एकूण १०० मुलांची निवड करण्यात आली. त्यातून ५० मुलांची निवड केली जाईल. या मुलांमध्ये कोरोना प्रतिबंधक अँटीबॉडी तयार झालेल्या नाहीत याची चाचणी केली जाईल. त्यानंतर या मुलांना आज भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन ही लस दिली जाणार असल्याची माहिती बालरोग तज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली.