देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची संख्या ३२ कोटींच्या पलीकडे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ३२ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे एकंदर ३२,१७,६०,०७७ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

२१ जूनपासून सुरु करण्यात आलेल्या टप्प्यात काल ६४,२५,००० हून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटातील ३६,६८,००० जणांना लसीची पहिली तर १,१४,५०६ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाल्यापासून ३७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकंदरीत ८ कोटी ३० लाखांपेक्षा जास्त जणांना लसीची पहिली तर १८,४८,७५४ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील १० लाखाहून अधिक जणांचं लसीकरण करण्यात आले आहे.