सारथी, अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सारथी, अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण आणि विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसंच उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक निधी देण्याबरोबरच स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं शिष्टमंडळ आणि सारथी संस्थेच्या संचालक मंडळासोबत काल पुण्यात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालयं आणि एक उपकेंद्र सुरु केलं जाणार आहे.

पहिलं उपकेंद्र कोल्हापुरात पुढच्या महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातल्या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमधे सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी वसतिगृह सुरु केलं जाईल, सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

सारथी संस्थेनं पुढच्या तीन वर्षाचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा. त्यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. सारथी संस्थेचे बंद असलेले उपक्रम तसंच शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित असलेले काही उपक्रम मान्यता घेवून उपक्रम सुरु केलं जातील.

प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये  सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा दिली जाईल. तारादूत प्रकल्पही सुरु केला जाईल, शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक आणि नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं ही त्यांनी सांगितलं.

सारथी संस्थेनं दिलेल्या आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा समाजातल्या तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम सुरु करावेत, असे निर्देशही अजित पवार यांनी यावेळी दिले.

 

 

Popular posts
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image