राज्यात रविवारी कोरोनाचे ७ हजार ५०४ रुग्ण बरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ५०४  रुग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ४४२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत ३ कोटी ८० लाख ४६ हजार ५९०  प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी १५ पूर्णांक ५३ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. म्हणजेच ५९ लाख ८ हजार ९९२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ५६ लाख ३९ हजार २७१  रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ११ हजार १०४ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १ लाख ५५ हजार ५८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक ४४ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर १ पूर्णांक ८८ शतांश टक्के आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात काल २९३ रुग्ण कोरोना मुक्त झाले काल जिल्ह्यात ५८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. होय जिल्ह्यात काल या आजारामुळे १८ रुग्णांचा मृत्यू झाला.

धुळे जिल्ह्यात काल ३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.एकूण ४१ हजार ४१४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

सांगली जिल्ह्यात काल बरे झालेल्या ८७८ रुग्णांना घरी पाठवलं. काल जिल्ह्यात ८१२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या आठ हजार ९५१ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात काल वीस रुग्ण दगावले.

रायगड जिल्ह्यात काल ५५९ नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यात काल या आजारानं १९ रुग्णांचा बळी घेतल.

परभणी जिल्ह्यात  काल ते ३० रुग्णांनी कोरोना वर मात केली काल २५ रुग्णांना या आजाराची लागण झाली. सध्या ८१२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल एक रुग्ण दगावला.

नांदेड जिल्ह्यात काल ४२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली काल जिल्ह्यात २० नवीन रुग्णांची भर पडली सध्या ५०३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

वाशिम जिल्ह्यात काल ८३ रुग्ण या आजारातून मुक्त झाले. काल ३३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ६४२ रुग्ण उपचाराधीन आहेत. काल २ रुग्ण दगावले.

जालना जिल्ह्यात काल २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल २२ नवीन रुग्ण आढळले. सध्या ४३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल ६ रुग्णांनी आपला प्राण गमावला.

 

 

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image