आधार कार्ड आणि पॅन जोडणीसाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधार कार्ड आणि पॅन जोडणीसाठी केंद्र सरकारनं ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. विवाद से विश्वास या योजनेंतर्गत रकमेचा विनाव्याज भरणा करण्यासाठीही ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन सरकारनं कोविड-१९  उपचारावरील खर्च आणि कोविड-१९ मुळे झालेल्या मृत्यूनंतर  मिळालेल्या सानुग्रह मदतीवरही  कर सवलत जाहीर केल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.

कोविड-१९ ने मृत्यूमुखी पडलेल्या करदात्यांच्या मालकांनी कुटुंबियांना आर्थिक मदतीवर कर आकारला जाणार नाही, तर अशा व्यक्तींना इतर कोणत्याही व्यक्तींकडून मिळालेल्या मदतीवर दहा लाखांपर्यंत कर सवलत दिली जाईल, असं ठाकूर यांनी अर्थमंत्रालयाच्या निर्णयांची माहिती देताना सांगितलं.