मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी आहेत आणि जन आणि वन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून ते काम करतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं. राज्यातल्या मानद वन्यजीव रक्षकांशी त्यांनी काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करून त्यांचं सहजीवन विकसित करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यासाठीच्या उपाययोजना त्यांनी शासनास सुचवण्याचं आवाहन त्यांनी केलं