राजभवन येथील पोलीस कॅन्टीन स्टोअरचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

  राजभवन येथील पोलीस कॅन्टीन स्टोअरचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे स्टोअर उद्घाटन संपन्न झाले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यावेळी उपस्थित होते.

राज्यपालांनी आयुक्त नगराळे यांचेसोबत कॅन्टीन स्टोअरला भेट देऊन विविध उत्पादनांची तसेच गृहोपयोगी वस्तूंची माहिती घेतली. हे कॅन्टीन स्टोअर्स पूर्णपणे रोखविरहित असेल. ग्राहकांना केवळ कार्डद्वारे खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल भरता येईल.

राजभवन येथील पोलीस कॅन्टीनमधून महाराष्ट्र पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे राजभवन व जवळपासच्या परिसरात कर्तव्य बजावित असलेले जवान तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना अन्नधान्य, किराणा सामान, इलेक्ट्रोनिक वस्तू तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तू माफक दरात उपलब्ध होणार आहेत.

राजभवन परिसरात सुरु करण्यात आलेले पोलीस कॅन्टीन मुंबईतील सहावे पोलीस कॅन्टीन आहे.

मुंबई पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या हस्ते दिनांक 26 जानेवारी 2012 रोजी करण्यात आले होते. सध्या नायगाव, वरळी, मरोळ, ताडदेव व कोळे कल्याण या ठिकाणी कॅन्टीनच्या शाखा आहेत.

 

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image