मुंबई, मुंबई, कोकणात पुढील सहा दिवस अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशाराकोकणात पुढील सहा दिवस अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मोसमी पावसाची आगेकूच सुरु आहे. ३५ टक्क्याहून जास्त प्रदेश मान्सूनने व्यापला असून मुंबई आणि उत्तर कोकणात तो अपेक्षेआधीच दाखल झाला आहे. काल संध्याकाळपासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत सांताक्रूझ इथं ५० पूर्णांक ४ दशांश मिलीमीटर, तर कुलाबा इथं ६५ पूर्णाक ४ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहराच्या सखल भागात पाणी साचलं होतं. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. पूर्व द्रुतगती मुक्त महामार्गावर मुसळधार पावसामुळं दृष्यमानता कमी झाली होती. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत आहे. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पुढचे ६ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे.

Popular posts
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
देशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त
Image
पुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
Image
१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ
Image