मुंबईतील म्हाडाच्या २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबईमधल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचं पावसाळापूर्व सर्वेक्षणात आढळून आलं आहे. या २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १० इमारतींचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या इमारतली जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्ष ०२२- २२६९४७२५/२२६९४७२७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.