प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत कोविड-१९ संदर्भात देशातली परिस्थिती तसेच विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. एप्रिल मध्ये झालेल्या बैठकीत प्रधानमंत्र्यांनी सर्व केंद्रीय मंत्रयांना लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचे निर्देश दिले होते.