छत्रपती राजर्षीशाहू महाराज यांच्या 147 व्या जयंती निमित्त आम आदमी पार्टी तर्फे अभिवादन..

 


पिंपरी : छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच "सामाजिक न्याय दिवस" राजर्षी शाहू महाराज यांच्या के एस बी चौक चिंचवड स्टेशऩ रोडवरील पुतळ्यास आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .या वेळी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा यांनी बोलताना सांगितले. आरक्षण देणारा पहिला राजा. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना१ रु, दंड ठोकणारा राजा. कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा.अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववादयावर प्रहार करणारा राजा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा..सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.. छत्रपती शाहू महाराज अस ते म्हटले "छत्रपती शाहू महाराजांनी समाजात समता, बंधुता, समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना समान न्याय दिला. समाजात सामाजिक बदल घडवून आणण्याची प्रेरणा त्यांनी दिली. विधवा स्त्रियांना आपले हक्क मिळवून दिले, आंतरजातीय विवाहाला मान्यता देऊन त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला."

समाजासाठी विशेष कार्य लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी असे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष स्मिता पवार सांगितले. "ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात," असे आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर समिती सदस्य वजनासाठी यांनी म्हटले. यावेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष चेतन बेंद्रे, प्रज्ञेश शितोळे, वाहब शेख, तेजस्विनी माश्रुल्ला, स्वप्निल जेवले, चांद मुलानी, कपिल मोरे , नंदू नारंग, यशवंत कांबळे, डीएस ननवरे, एकनाथ पाठक, प्रवीण शिंदे , सुजय शेठ , आदी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image