एप्रिल महिन्यात वस्तु आणि सेवा कराचं १,४१,३८४ कोटी रुपयांचं विक्रमी संकलन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एप्रिल महिन्यात जी एस टी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे विक्रमी १,४१,३८४ कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे. त्यापैकी केंद्रीय जी एस टी २७,८३७ कोटी रुपये, राज्य जी एस टी ३५,६२१ कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी ६८,४८१ कोटी रुपये आणि सेसमधून नऊ हजार ४४५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
मार्च २०२१ च्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात १४ टक्क्यांची वाढ झाली असल्याची अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. कोविड काळातही भारतीय व्यवसाय जगताने लक्षणीय कामगिरी केली असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
उद्योग जगताने आयकरही वेळेवर दाखल केला असून जी एस टी ची रक्कमदेखील वेळेवर भरली आहे. दरम्यान जी एस टी लागू झाल्यापासून एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक जीएसटीचे सर्वाधिक संकलन केलं आहे.
जी एस टी महसूल केवळ गेल्या सात महिन्यांपासून एक लाख कोटी रुपयांच्या पुढे तर गेला आहेच शिवाय त्यात सातत्याने वाढदेखील होत आहे.
बनावट बिलांवरील देखरेख, जी एस टी, आयकर आणि सीमाशुल्क आय टी प्रणालींसह विविध स्त्रोतांकडील माहितीचे सखोल विश्लेषण आणि कर प्रशासनाच्या प्रभावी कामकाजामुळे कर महसुलात वाढ होण्यास मदत झाली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.