मुंबई महापालिकेने लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं विशेष खबरदारी घेत वरळी इथं लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली.

पालिकेला सीएसआर फंडामधून मिळालेल्या ५० कोटी रुपयांच्या निधिमधून हे केंद्र उभारलं जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. जुलै - ऑगस्टच्य़ा दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका जाणवू शकतो असे मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image