राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ९० टक्क्याच्या उंबरठ्यावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रविवारी ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आतापर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक ७४ शतांश टक्के झालं आहे. सध्या राज्यात ४ लाख ६८ हजार १०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रविवारी ३४ हजार ३८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत करोनाबाधित झालेल्यांची एकूण संख्या ५३ लाख ७८ हजार ४५२ झाली आहे. रविवारी ९७४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ८१ हजार ४८६ वर पोचली आहे. राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ५२ शतांश टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या ३ कोटी ११ लाख ३ हजार ९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक २९ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.