मुंबईत ज्येष्ठ आणि दिव्यांगांना लसीचा दुसरा डोस नोंदणी न करता थेट केंद्रावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत ज्येष्ठ आणि दिव्यांगांना लसीचा दुसरा डोस आता नोंदणी न करता थेट केंद्रावर जाऊन घेता येणार आहे. ६० वर्ष अधिक वयोगटातले लाभार्थी आणि दिव्यांगांना कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मिळेल.

तर इतर लाभार्थ्यांसाठी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस केंद्रांवर मिळेल. १०० टक्के लसीकरण कोविन अॅपवर नोंदणीनंच केलं जाणार आहे. याबाबतची नवी नियमावली पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काल जाहीर केली.