बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या तराफांवर काम करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. बार्ज पी ३०५ या तराफेवर गेल्या दोन दिवसांपासून मदत आणि बचावकार्य सुरू होतं.

त्यातल्या १८८ जणांना  सुरक्षितरित्या आयएनएस कोची द्वारे मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यात नौदलाला यश आलं आहे. मात्र यावर काम करणाऱ्या २२ जणांचे प्राण वाचवता आलेले नाहीत. अजूनही बचाव कार्य पूर्ण झालेलं नसल्याचं नौदलानं कळवलं आहे.

Popular posts
रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही- उच्च न्यायालय
Image
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
Image
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Image