देशात मंगळवारी ४ हजार २०५ कोविड रुग्णांचा मृत्यू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात मंगळवारी  ३ लाख ५५ हजार कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ लाख ४८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४ हजार २०५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण मृत्युसंख्येचा एकाच दिवसातला हा उच्चांक आहे. देशात आतापर्यंत १ कोटी ९३ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशातला कोरोना मुक्तीचा दर ८३ पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात ३७ लाखापेक्षा जास्त एक्टीव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत या संसर्गानं २ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या १७ कोटी ५२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. मंगळवारी २४ लाख ४३ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.