मुंबईतल्या कोविड उपचार केंद्रांची मॅपींग करण्याची गरज - आदित्य ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत, कोविड संदर्भातील कोणती सुविधा कुठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती नागरिकांना मिळायला हवी, त्यासाठी मुंबईतल्या कोविड उपचार केंद्र, जम्बो सेंटर्स, लसीकरण केंद्र तसंच अतिदक्षता सुविधांच्या केंद्रांचं मॅपींग करायची गरज आहे असं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे यांनी आज कोविड संदर्भातल्या उपाययोजना आणि व्यवस्थापनात मुंबईतल्या विविध यंत्रणांमधला समन्वय वाढवता यावा यासाठी ऑनलाईन बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी हा महिना महत्वाचा असल्यानं, सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करायचं आवाहन त्यांनी केलं. उपचारांच्यादृष्टीनं खाजगी केंद्रांकडे असलेल्या औषधांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेऊन प्रशासनानं त्यांना आवश्यक सहकार्य करावं अशी सूचनाही त्यांनी केली.

मुंबईतली पावसाळ्याधीची काम पूर्ण होण्याच्यादृष्टीनं, कामकारांच्या स्थलांतराची परिस्थिती लक्षात घेऊन कामांचं नियोजन करावं आणि समन्वय राखावा असं आवाहनही त्यांनी केलं.

या बैठकीला जिल्हाधिकारी, महापालिकेच्या परिक्षेत्रांचे उपायुक्त, पोलीस उपायुक्त, तसंच वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image