स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विविध नेत्त्यांच त्यांना अभिवादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले आहे. २८ मे  १८८३ रोजी सावरकरांचा नाशिक जिल्यातल्या भगूर इथे जन्म झाला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला सातारा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या परिषद सभागृहात सावरकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.